आपला जिल्हा

वाढीव घरपट्टी विरोधात कोपरगावात सोमवारी राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

  • वाढीव घरपट्टी विरोधात कोपरगावात सोमवारी राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन
वाढीव घरपट्टी विरोधात कोपरगावात सोमवारी राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १९ जुन २०२६कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवारी (दि.२२) रोजी सकाळी १० वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. 

जाहिरात
कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर  वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात आल्याच्या अधिकृत पावत्या नागरिकांना देण्यात आल्या आहे. या संदर्भात हजारो नागरिकांनी नगरपालिकेत आणि आ. आशुतोष काळे संपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदविल्या आहे. मात्र नगरपरिषदेकडून करवाढी बाबत कोणताही पुनर्विचार होण्याचे संकेत दिसत नसून नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींवर काय कारवाई करणार याचे नगरपरिषदे कडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. ज्या नागरिकांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आलात त्याच नागरिकांवर अन्यायकारक अवाजवी वाढीव घरपट्टी (मालमत्ता कर) आकारत असून नागरिकांना विचारात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत.

जाहिरात

या वाढीव कर पट्टीमध्ये मालमत्तांचे चुकीचे वर्गीकरण, कर निर्धारणातील त्रुटी, आकारणीत विसंगती आढळून आल्या असून या संदर्भात नागरिकांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपरिषद उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कर वाढी संदर्भात सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप या संदर्भात पालिकेकडून कोणतीही कारवाई होतांना दिसत नसल्याने कोपरगावकरांच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवारी (दि.२२) रोजी सकाळी १० वाजल्यापासून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे