आपला जिल्हा

गौतम बँकेच्या व्हा.चेअरमनपदी विजय यादवराव रक्ताटे यांची निवड

गौतम बँकेच्या व्हा.चेअरमनपदी विजय यादवराव रक्ताटे यांची निवड

गौतम बँकेच्या व्हा.चेअरमनपदी विजय यादवराव रक्ताटे यांची निवड

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ जानेवारी २०२६ :- सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता असलेल्या आणि दर्जेदार सेवा देण्यात अग्रभागी असणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या व्हा.चेअरमनपदी विजय यादवराव रक्ताटे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान व्हा.चेअरमन सुनिल डोंगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर विजय यादवराव रक्ताटे यांची निवड करण्यात आली आहे.

जाहिरात

 नुकतेच अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था एस.पी.रुद्राक्ष कोपरगाव यांच्या उपस्थितीत गौतम सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या व्हा.चेअरमनपदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी व्हा.चेअरमनपदासाठी विजय यादवराव रक्ताटे यांच्या नावाची सूचना जेष्ठ संचालक बाबुराव थोरात यांनी मांडली. सदर सूचनेस मावळते व्हा. चेअरमन सुनिल डोंगरे यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी निवडणूक अधिकारी एस. पी. रुद्राक्ष तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव यांनी व्हा.चेअरमनपदी विजय यादवराव रक्ताटे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले.

जाहिरात

गौतम सहकारी बँकेच्या व्हा.चेअरमनपदी विजय रक्ताटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे बँकेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बँकेचे चेअरमन संजय आगवण, मावळते व्हा.चेअरमन सुनिल डोंगरे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विजय रक्ताटे म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातून असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा, शेतकऱ्यांचे प्रश्न यांची जाणीव आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, युवक व सर्वसामान्य सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे. मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी विश्वासाने माझ्यावर बँकेच्या विकासाची दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने आणि सर्वाना सोबत घेवून यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बँकेचे चेअरमन संजय आगवण, मावळते व्हा.चेअरमन सुनिल डोंगरे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तिरसे संचालक राजेंद्र ढोमसे, बाबुराव थोरात, कमलाकर चांदगुडे, बापूसाहेब वक्ते, तुकाराम हूळेकर, उत्तम भालेराव, सौ.सिंधुबाई रोहोम, सौ.रुपाली संवत्सरकर, दत्तात्रय खेमनर,अॅड. मासूम सय्यद, अॅड. शिरिषकुमार लोहकणे, रामराव माळी, शरद होन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे