एस.एस.जी.एम महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मान्यवर डॉक्टरांचा सत्कार व मार्गदर्शन

एस.एस.जी.एम महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मान्यवर डॉक्टरांचा सत्कार व मार्गदर्शन
एस.एस.जी.एम महाविद्यालयात राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मान्यवर डॉक्टरांचा सत्कार व मार्गदर्शन

Kopargaon vijay kapse दि ३० जून २०२६- आरोग्यदायी जीवनशैली, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व, बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या तसेच आधुनिक वैद्यकीय क्षेत्रासमोरील विविध आव्हाने” या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री सडुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे आरोग्य समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या समाजातील अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासोबतच आरोग्यदायी जीवनशैली, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व आणि वैद्यकीय क्षेत्रासमोरील विविध आव्हाने या विषयांवर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. अंकित कृष्णानी, डॉ. एस. डी. अजमेरे, डॉ. हेमंत राठी व डॉ. गोवर्धन हुसळे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अजमेरे, डॉ. हेमंत राठी, डॉ. अमेय राठी, डॉ. गिरीश क्षत्रिय, डॉ. उदय क्षत्रिय, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. बाणेश गायकवाड, डॉ. अभिजीत आचारी, डॉ. उमेश कोठारी, डॉ. कृष्णा फुलसौंदर डॉ. साहिल खोत, डॉ. अनिकेत खोत, डॉ प्रितम जपे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. निखिल महानुभाव, डॉ. अजिंक्य ढाकणे, डॉ. वैभव गवळी, डॉ साहिल दुशिंग, डॉ. निखिल देवकर, डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. हर्षद आढाव, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. चिंतन कोठारी, डॉ. योगेश लाडे, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. संकेत मुळे, डॉ. शिरीष मुळे, डॉ. वरद गर्जे आदी मान्यवर उपस्थितराहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. संदीप वर्पे हे भूषविणार आहे आहेत.

तरी सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.




