आपला जिल्हा

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
जाहिरात

Sangmner vijay kapse दि ३ जुलै २०२६अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध अल्ट्रामॅरेथॉनपटू व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. मंगेश वाकचौरे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.यावेळी डॉ. वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, नियमित व्यायाम, खेळातील शिस्त, जिद्द आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शाळेने घडविलेल्या संस्कारांमुळेच आजचे यश मिळाल्याचे नमूद केले. आयुष्यातील प्रत्येक ध्येय जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांच्या बळावर साध्य करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

जाहिरात
अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला आपल्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा नेहमीच अभिमान आहे. या शाळेने वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, उद्योग, शिक्षण, क्रीडा तसेच उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अनेक विद्यार्थी घडविले असून ते आज देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.

जाहिरात

डॉ. मंगेश वाकचौरे यांनी अल्ट्रामॅरेथॉन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत आयोजित अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेत ९० कि.मी. अंतर ४ तास ५० मिनिटांत पूर्ण करून विशेष कामगिरी केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी अनेक उल्लेखनीय यश मिळविले असून क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. सचिन गुंजाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी शालिनी  नाईकवाडी, संजय हासे, अनिल शिंदे, प्रेरणा पावडे, संगीता गायकवाड आणि स्वाती शिंदे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य आशिष कुमार, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त मा. आ. डॉ. सुधीर तांबे,   दुर्गा तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे.बी. गुरव तसेच प्राचार्य आशिष कुमार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे