आपला जिल्हा

नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वितरण 

नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वितरण 
दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के निधीचे ४९० लाभार्थ्यांना १४.९६ लाखांचे वितरण; भाजप दिव्यांग विकास आघाडीकडून नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
Kopargaon vijay kapse दि १० जुलै २०२६कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वितरण करण्यात आले.याअंतर्गत शहरातील सुमारे ४९० दिव्यांग बंधू-भगिनींना एकूण १४ लाख ९६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

जाहिरात
कोपरगाव शहरातील दिव्यांग बांधवांना वेळेत व पारदर्शकपणे आर्थिक लाभ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी अजित निकत, नगरपरिषदेचे गटनेते, सर्व सभापती,नगरसेवक तसेच दिव्यांग विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भाजप दिव्यांग विकास आघाडी, कोपरगाव यांच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान आपल्या मनोगतात म्हणाले,दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय,पारदर्शक व वेळेत मिळावा, ही कोपरगाव नगर परिषदेची भूमिका आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे नियमानुसार वितरण करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे.दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही दिव्यांग हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.

जाहिरात
याप्रसंगी भाजप दिव्यांग विकास आघाडी, कोपरगावचे तालुकाध्यक्ष मुकुंद (मामा) काळे, शहराध्यक्ष स्वप्निल कडू, योगेश गंगवाल, जयवंत मरसाळे, मुक्तारभाई पठाण, गौरव गायकवाड, राजेंद्र झाल्टे, सुनील कोसंदल यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते. उपस्थितांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशाच प्रकारे दिव्यांग हिताच्या योजना प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे