एस.एस.जी.एम. महाविद्यालयात अजितदादांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात अजितदादांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात अजितदादांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Kopargaon vijay kapse दि २४ जुलै २०२६ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नामदार स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले .यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्राध्यापक,कार्यालयीन सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सदर प्रसंगी ॲड. संदीप वर्पे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, त्यांची निर्णयक्षम कार्यशैली आणि जनसामान्यांशी असलेला जिव्हाळा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते. रयत शिक्षण संस्थेवर त्यांचे विशेष प्रेम होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले. ते समाजहितासाठी कार्य करावे, यासाठी ते नेहमीच आग्रही असत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या कार्यातून समाजहित, विकास आणि जनसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक योगदान देणे, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे सांगितले.



