आपला जिल्हा

संवत्सरचे ढेपले मुंबई महानगरपालिकेत उपअभियंता म्हणून निवड

संवत्सरचे ढेपले मुंबई महानगरपालिकेत उपअभियंता म्हणून निवड

संवत्सरचे ढेपले मुंबई महानगरपालिकेत उपअभियंता म्हणून निवड
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ जुन २०२५– कोपरगाव तालुक्यातील  संवत्सर गावचे कारभारी म्हातारबा ढेपले गुरुजी यांचे नातू तुषार संगीता सुनील ढेपले यांची नुकतीच शासनाच्या सरळ सेवा भरती मधून जगातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेच्या उपअभियंता पदी निवड झाल्याने संपूर्ण कोपरगाव तालुक्यासह संवत्सर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात
 तुषार ढेपले हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील कारभारी ढेपले यांचे चिरंजीव तर सेवानिवृत्त शिक्षक अशोक ढेपले व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजेंद्र ढेपले यांचे ते पुतणे असून त्यांनी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज मधून बी सिव्हील पूर्ण करत स्व:अभ्यास करत हे अत्युच्य यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संवत्सर गावच्या सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे आदींसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे