साई शक्तीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

साई शक्तीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
साई शक्तीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Kopargaon vijay kapse दि १५ ऑगस्ट २०२६: ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कासली येथील साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल व साई शक्ती आश्रम येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरंदे महाराज यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, कमलाताई, बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विशाल धरणगावकर, निलेश देवकर, योगेश पाठक, नितीन शिंदे, प्रकाश शिंदे, भाऊसाहेब मलिक, संदीप मलिक, चांगदेव मेंढे, मोहन सुंबे, नवनाथ चव्हाण, प्राची लांडगे, अमोल शिंदे, सुभाष शिंदे, मुस्ताक पटेल, श्वास मलिक, विकास साळुंखे, राहुल शिंदे, विलास मलिक, ज्ञानेश्वर भगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांविषयी भावना व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

संस्थापक अध्यक्ष डॉ. साबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांना ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे त्यांनी आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सोनाली कापसे यांनी केले, तर आभार सुशांत साबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक विलास चव्हाण, पूजा गोरडे, अलका जाधव आदींनी परिश्रम घेतले.





