आपला जिल्हा

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘गंगा गोदावरी महाआरती’; चारही श्रावणी सोमवार भक्तिमय वातावरणात साजरे होणार

 संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘गंगा गोदावरी महाआरती’; चारही श्रावणी सोमवार भक्तिमय वातावरणात साजरे होणार
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘गंगा गोदावरी महाआरती’; चारही श्रावणी सोमवार भक्तिमय वातावरणात साजरे होणार
Kopargaon vijay kapse दि १५ ऑगस्ट २०२६ पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर श्रावण महिन्यातील भक्ती आणि धार्मिक परंपरेला नवे स्वरूप देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान, कोपरगावच्या वतीने ‘गंगा गोदावरी महाआरती’ या विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साधू-संत, महंत, शिवभक्त आणि कोपरगावकर भाविकांच्या उपस्थितीत चारही श्रावणी सोमवारी गोदावरी मातेची महाआरती पार पडणार आहे.

जाहिरात
 संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी तीन वर्षांपूर्वी ‘गंगा गोदावरी आरती’चा उपक्रम सुरू केला. हिंदू धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या काशी येथे गंगा नदीच्या तीरावर होणाऱ्या भव्य गंगा आरतीच्या धर्तीवर कोपरगावातील पवित्र गोदावरी तीरावर या आरतीची सुरुवात करण्यात आली. मागील तीन वर्षांत या उपक्रमाला कोपरगावकर भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी या आरतीत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे.

जाहिरात
यंदाच्या महाआरतीची सुरुवात सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. त्यानंतर सोमवार, २४ ऑगस्ट, सोमवार, ३१ ऑगस्ट आणि सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजीही सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे. गोदावरी तीर, लहान पूल, कोपरगाव येथे या चारही श्रावणी सोमवारी हा भक्तिमय सोहळा पार पडणार आहे.

जाहिरात
भारतीय संस्कृतीत नद्यांना केवळ जलस्रोत म्हणून नव्हे, तर जीवनदायिनी आणि पूजनीय मानले जाते. गोदावरीला धार्मिक परंपरेत ‘दक्षिण गंगा’ म्हणून विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गोदावरी मातेप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच नदीच्या पावित्र्याचे संवर्धन करण्याची भावना समाजात निर्माण करणे, तसेच नव्या पिढीला आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
युवा सेवकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाने आता कोपरगावच्या धार्मिक वातावरणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. धार्मिक परंपरा आणि युवा सहभाग यांचा सुंदर संगम या महाआरतीच्या माध्यमातून घडत असून, श्रावणातील प्रत्येक सोमवार गोदावरी तीरावर सामूहिक भक्तीचा अनुभव देणारा ठरणार आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी मंत्रोच्चार, शंखनाद, दीपप्रज्वलन आणि सामूहिक आरतीने गोदावरी तीर भक्तीच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. काशीच्या गंगा आरतीची अनुभूती कोपरगावकरांना आपल्या गोदावरी तीरावर घेता यावी आणि कोपरगावच्या पौराणिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला अधिक व्यापक स्वरूप मिळावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या चारही महाआरतींना साधू-संत, महंत, शिवभक्त, महिला-भगिनी, युवक तसेच शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोदावरी मातेच्या आरतीत सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे