आपला जिल्हा

शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन

 शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन

शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १८ ऑगस्ट २०२६ : कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी वसलेल्या जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त पाहावा लागत नाही असे श्री कोपरगाव बेट देवस्थानच्या वतीने परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांचा जन्मोत्सव तसेच शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी श्री क्षेत्र बेट-कोपरगाव येथील परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात हिंदू पंचांगानुसार शके १९४८ श्रावण शुद्ध अष्टमी या पवित्र तिथीनिमित्त हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांची भव्य पालखी मिरवणूक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन यांच्या वतीने देण्यात आली आहे.

जाहिरात

आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी सकाळी ९ वाजता श्री परम सद्गुरूंचे आगमनाने होणार असून, सकाळी ९.३० वाजता श्री गुरु शुक्राचार्य मुखवटा स्थापना व पुण्याहवाचन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजेपासून श्री परम सद्गुरूंची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता शुक्र जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा होईल. दुपारी १२ वाजता मध्याह्न महाआरती, तर दुपारी १२.३० वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

या सोहळ्यास संत जनार्दन स्वामी आश्रम, बेट-कोपरगावचे प. पू. महंत रमेशगिरीजी महाराज, जंगली महाराज आश्रम कोकमठाणचे प.पू. महंत परमानंदजी महाराज तसेच श्री राघवेश्वर देवस्थान, कुंभारीचे प.पू. महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्यासह  कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे व विधानपरिषद सदस्य आमदार विवेक कोल्हे आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास मंदिर प्रशासन, सर्व ट्रस्टी, बेट ग्रामस्थ, ब्रह्मवृंद, कर्मचारी, बेट परिसरातील तरुण मंडळे, मित्र परिवार व शिव-शुक्र भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे