आपला जिल्हा

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची निवड

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची निवड
संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची निवड
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २० ऑगस्ट २०२६आठवणी आणि जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी ठेवण्यासाठी फोटो हे महत्त्वाचे असतात. संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी घुलेवाडी येथील साई दिघे यांची तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे व सचिव पदी सुनील राहणे यांची एकमताने निवड झाली आहे.

जाहिरात
व्यापारी असोसिएशन येथे झालेल्या बैठकीमध्ये पद्मश्री रघुवीर खेडकर व ज्येष्ठ इतिहास संशोधक डीबी राठी सर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यानंतर झालेल्या वार्षिक बैठकीमध्ये साई दिघे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. साई दिघे हे तरुण व हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. उपाध्यक्षपदी निलेश शिंदे सचिव पदी सुनील राहणे तर कार्यकारणी मध्ये ज्येष्ठ फोटोग्राफर काशिनाथ गोसावी, प्रवीण दिघे ,ओंकार कोदे ,सलीम पटेल, पंकज देशमुख, गोपाल बोराडे, अमोल नवले, ऋषी दुबे, तानाजी हळनर ,अक्षय कोटकर, संतोष दिघे ,चेतन कडणे, विठ्ठल जोंधळे ,अनिकेत फटांगरे,  रामभाऊ भागवत, किरण डोंगरे, संदीप शेळके, निलेश मिसाळ, संतोष नाईकवाडी, दीपक घुले, शहाजी काळे ,संतोष देशमुख, गोविंद गोसावी, राजेंद्र गुळवे, राजेंद्र जगताप ,विवेक गुंजाळ यांचा समावेश आहे.

जाहिरात

यावेळी निवडीबद्दल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे डॉ.जयश्री थोरात ,डॉ मैथिली तांबे, पांडुरंग पाटील घुले, रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे