इलेक्ट्रीक ट्रॅक्टरद्वारे पर्यावरणपुरक शेतीसाठी संजीवनीचे पहिले पाउल-आमदार विवेक कोल्हे
इलेक्ट्रीक ट्रॅक्टरद्वारे पर्यावरणपुरक शेतीसाठी संजीवनीचे पहिले पाउल-आमदार विवेक कोल्हे
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २१ ऑगस्ट २०२६–डिझेलच्या दरात सातत्यांने वाढ होत असल्यांने शेती मशागतीच्या तत्सम खर्चात दिवसेंदिवस शेतक-यांसमोर नवनविन प्रश्न निर्माण होत आहे त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने पर्यावरण पूरक आधुनिक तंत्राच्या वापराला सर्वोच्च प्राधान्य देत इलेक्ट्रीक ट्रॅक्टरद्वारे पर्यावरणपुरक शेतीसाठी पहिले पाउल टाकले असल्याचे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.
जाहिरात
माँत्रा कंपनीने शेती व अन्य कामासाठी ४५ एच. पी. क्षमतेच्या इलेक्ट्रीक ट्रॅक्टरची नव्यांने निर्माती केली असुन राज्यात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सदर ट्रॅक्टरची खरेदी केली त्याची पहिली प्रात्याक्षीक राईड श्रीसाईबाबांच्या शिर्डी येथे गुरूवारी घेण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी मात्रा इलेक्ट्रीकचे महाराष्ट्र विभागीय प्रमुख प्रकाशगिरी प्रास्तविक करतांना म्हणांले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक डिजीटल तंत्रज्ञानातुन आत्मनिर्भर विकसीत भारतात पर्यावरणपुरक उपक्रमांना सातत्यांने प्राधान्य दिले असुन त्यातुनच या ट्रॅक्टरची निर्मीती करण्यांत आली आहे. विक्री विभागाचे बलराम मुर्ती म्हणाले की, शेतीतील दैनंदिन कामासाठी मात्रा इलेक्ट्रीक ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर दोन तासांच्या सिंगल चार्जमध्ये १०० किलोमिटर प्रवासाची क्षमता असुन त्याच्या वापरातुन डिझेलच्या खर्चात मोठया प्रमाणांत बचत होते. आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी या ट्रॅक्टरची तांत्रीक वैशिष्टये व कार्यपध्दती जाणुन घेतली.जाहिरात
आमदार विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, अमेरिका इस्रायल विरूध्द इराणच्या युध्दात आपल्याला पेट्रोल, डिझेल, गॅस संदर्भात मोठया प्रमाणांत अडचणींचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करताना असंख्य त्रासाला सामोरे जावे लागले. या इलेक्ट्रीक ट्रॅक्टरच्या सहायांने शेतीतील मशागतीची कामे केली तर पर्यावरणाची हानी कमी होते, वेळेबरोबरच इंधन खर्चात मोठी बचत होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विकसीत विरूध्द विकसनशील देशात शेती खर्चात बचत होण्यांसाठी सातत्यांने विविध उपाययोजना केल्या. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनीही पर्यावरणपुरक शेतीची इलेक्ट्रीक साधने वापराला सर्वोच्च प्रधान्य दिले आहे त्यामुळे शेतक-यांनी इलेक्ट्रीक ट्रॅक्टरच्या सहायांने शेतीचे तंत्र अवलंबवावे व शेती खर्चात बचत करावी. भविष्यात शेतीमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढेल, तेव्हा शेतकऱ्यांनी नव्या बदलाला सामोरे जावे असेही ते शेवटी म्हणांले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, शेतकी विभागाचे कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी Montra Electric चे महाराष्ट्र झोनल हेड प्रकाश गिरी, TM Sales चे बलराम मूर्ती आणि Demonstrator चैतन्य कापसे यांनी ट्रॅक्टरची तांत्रिक माहिती व प्रात्यक्षिक दिले.