आपला जिल्हा

रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देण : बाळासाहेब थोरात

रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देण : बाळासाहेब थोरात

बंधुत्वाचा संदेश देणारा सण रक्षाबंधन

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २८ ऑगस्ट २०२६रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि अतूट नात्याचा संदेश देणारा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी असून, समाजात बंधुभाव वाढविणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जाहिरात

रक्षाबंधनानिमित्त नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन केले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शरद नाना थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये मोठी विविधता असून विविध सण आणि परंपरा आपण आनंदाने साजरे करतो. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व सांगणारा आणि निस्वार्थ प्रेमाचा संदेश देणारा रक्षाबंधन हा आदर्श सण आहे. या सणातून परस्पर प्रेम, विश्वास आणि बंधुभावाची भावना दृढ होते.

जाहिरात

महिलांचे शिक्षण आणि सुरक्षितता ही प्रत्येक भावाची जबाबदारी आहे. महिलांना समान संधी आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. रक्षाबंधनाच्या आदर्श परंपरेतून समाजात बंधुभाव वाढीस लागावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शहर व तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे