आपला जिल्हा

औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचा अभिमान; उद्योजकांनी स्व. शंकरराव कोल्हे यांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकारले – बिपीनदादा कोल्हे

औद्योगिक वसाहतीच्या प्रगतीचा अभिमान; उद्योजकांनी स्व. शंकरराव कोल्हे यांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकारले – बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
Kopargaon vijay kapse दि ३ सप्टेंबर २०२६ –  कोपरगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक हे आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहेत. त्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे.येथील उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनांची देशासह परदेशातही निर्यात होत असून, औद्योगिक वसाहतीचे नाव देश-विदेशात पोहोचले आहे. उद्योजकांनी स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेले औद्योगिक विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले असून, ही बाब अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

जाहिरात
कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता औद्योगिक वसाहत सभागृहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन केशवराव भवर होते. अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची सूचना हशीमभाई चाँद पटेल यांनी मांडली, तर रविंद्र नरोडे यांनी अनुमोदन दिले.

जाहिरात
यावेळी कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या सह संचालक मनोजशेठ अग्रवाल, प्रशांत होन, रोहित वाघ, पंडीत भारुड, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, परेश ठोळे, सागर शहा, अभिजीत राहतेकर, सोमनाथ निरगुडे व विवेक परजणे, तसेच कारखानदार संजय जगदाळे, जितेंद्रसिंग सारदा आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि.चे प्रतिनिधी बाळासाहेब वक्ते उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी औद्योगिक वसाहतीच्या वतीने बिपिनदादा कोल्हे यांचा केशवराव भवर, संचालक मंडळ तसेच उपस्थित उद्योजकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जाहिरात
कोपरगाव येथील औद्योगिक वसाहती मधील उद्योजकांना मार्गदर्शन करताना बिपिनदादा कोल्हे यांनी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या योगदानाचे कौतुक केले. नव्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळणे, उद्योगांची वाढ होणे आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होणे, हे औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. औद्योगिक वसाहतीतील उद्योगांची उत्पादने देशाच्या विविध भागांसह परदेशात पोहोचत असल्याने वसाहतीच्या लौकिकात भर पडत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सभेच्या निमित्ताने औद्योगिक क्षेत्रात कार्यरत तसेच नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यात आला. मे. ताराचंद अॅग्रोचे प्रोप्रायटर शरद खरात यांना नवउद्योजक, तर मे. ओम साई स्टील फर्निचरचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर शिनगर यांना आदर्श उद्योजक म्हणून बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील नवउद्योजक मे. युनायटेड अॅग्रो फोजन फुड्स प्रा. लि.*चे मॅनेजिंग डायरेक्टर संतोष थोरात यांचाही गौरव करण्यात आला. या तिन्ही उद्योजकांना औद्योगिक वसाहतीच्या वतीने शाल, ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. सभेतील नियोजित कामकाजाची प्रोसिडिंग वाचन औद्योगिक वसाहतीचे असिस्टंट मॅनेजर एस. डी. लोखंडे यांनी केले. संस्थेच्या कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर सभासदांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर संचालक पंडीत भारुड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे