आपला जिल्हा

निळवंडे कालव्याच्या डीवाय- ४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवण्यासाठी अंतिम पाहणी पूर्ण- ज्ञानदेव गव्हाणे

निळवंडे कालव्याच्या डीवाय- ४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवण्यासाठी अंतिम पाहणी पूर्ण- ज्ञानदेव गव्हाणे

निळवंडे कालव्याच्या डीवाय- ४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवण्यासाठी अंतिम पाहणी पूर्ण- ज्ञानदेव गव्हाणे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ सप्टेंबर २०२६– आ.आशुतोष काळे यांनी जिरायती गावातील शेतकऱ्यांसमक्ष निळवंडे कालव्याचे कार्यकारी अधिकारी प्रदीप  हापसे व कैलास ठाकरे यांच्या समवेत वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत रांजणगाव देशमुख यथील मंगलमूर्ती लॉन्स या ठिकाणी डीवाय- ४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार रांजणगाव देशमुख येथील मंगलमूर्ती लॉन्स येथे डीवाय-४चारीवर व्हॉल्व्ह बसवण्यासाठी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांकडून बुधवार (दि.१६) रोजी अंतिम पाहणी करण्यात आली असल्याची माहिती अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानदेव गव्हाणे यांनी दिली.

जाहिरात

ज्ञानदेव गव्हाणे यांनी पुढे म्हंटले कि, कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती गावांना निळवंडेचे पाणी आणण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे कालव्यांचे पाणी पाझर तलाव, बंधारे व गाव तळ्यांपर्यंत पोहचविले आहे.उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या टप्पा १ मधून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव आणि बंधारे भरले जातात. मात्र या सर्व तलावांना आणि बंधाऱ्यांना निळवंडे कालव्यातूनही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी त्यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना रांजणगाव देशमुख येथील मंगलमूर्ती लॉन्स येथे डीवाय-४ चारीवर व्हॉल्व्ह बसविण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे. त्यासाठी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली आहे. व्हॉल्व्ह बसवल्यानंतर परिसरातील पाझर तलाव, गावतळे, साठवण तलाव व बंधारे निळवंडे कालव्याच्या माध्यमातून भरण्याची सोय होणार आहे. तसेच अंजनापूर व रांजणगाव देशमुखच्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यापूर्वी उजनी टप्पा क्र.१ मधून पाझर तलाव, गाव तळे व साठवण बंधारे भरले जात होते. आता त्याबरोबरच निळवंडे कालव्याच्या चारीतून पाझर तलाव, गाव तळे व साठवण बंधारे भरले जावे त्यासाठी हि सुविधा करण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांसह नागरिकांना होणार असल्याचे सरपंच ज्ञानदेव गव्हाणे यांनी म्हटले आहे.

जाहिरात

यावेळी निळवंडे कालव्याचे उपअभियंता आसिफ शेख, तुषार मंडलिक, ज्ञानदेव गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, संदिप थेटे, ज्ञानेश्वर गव्हाणे, सिताराम काकडे, मारुती गव्हाणे, हरीभाऊ गव्हाणे, रवी कोल्हे, काकासाहेब कोल्हे, बाबासाहेब गव्हाणे, गोकुळ गव्हाणे, तुकाराम गव्हाणे, बबलू गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, सुभाष गोर्डे, सागर गव्हाणे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-जिरायती गावातील नागरिकांची व शेतकऱ्यांची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी मा.आ.अशोकराव काळे यांनी २००४ ते २०१४ या काळात पदरमोड करून रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना चालविली. हि योजना तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली.या योजनेच्या माध्यमातून परिसरातील बंधारे, पाझर तलाव व गाव तळ्यांमध्ये पाणी उपलब्ध झाले. मात्र सत्तांतरणामुळे मध्यंतरीचे काही वर्षामध्ये हि योजना पुन्हा बंद पडली. परंतु आ.आशुतोष काळे यांनी २०१९ पासून हि योजना पुन्हा सुरु केल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून भरले जाणारे पाझर तलाव, साठवण तलाव, गावतळे यापुढे डीवाय-४ चारीतून देखील भरण्याची सोय आमदार आशुतोष काळे यांनी केल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्याबद्दल शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे आभार.-संदिप थेटे यांनी व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे