आपला जिल्हा

कल्पेशच्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कल्पेशच्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

‘रडत बसण्यापेक्षा मुलाच्या शिक्षणप्रेमाची आठवण जपण्याचा’ भिंगारे परिवाराचा अभिनव उपक्रम

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ सप्टेंबर २०२६:  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. भास्करराव भिंगारे यांचे नातू तथा शंकरराव कोल्हे शेतकरी संघाचे संचालक अरुण भिंगारे यांचा एकुलता एक मुलगा कल्पेश अरुण भिंगारे याचे गेल्या वर्षी अवघ्या वयाच्या २२ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. या दुःखद घटनेने भिंगारे परिवारासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती.

जाहिरात

कल्पेशच्या निधनाला मंगळवारी (१५ सप्टेंबर) रोजी १ वर्ष पूर्ण झाले. त्याच्या पुण्यस्मरणार्थ भिंगारे परिवाराने दुःखातही एक विधायक आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत मिठाई देऊन कल्पेशच्या आठवणींना उजाळा दिला.

जाहिरात

कल्पेश हा अत्यंत हुशार व मनमिळावू विद्यार्थी होता. शिक्षणाची त्याला विशेष आवड होती. उच्च शिक्षण घेत असताना भविष्यात परदेशात जाऊन नोकरी करत आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. मात्र नियतीने अवघ्या २२ व्या वर्षी त्याला भिंगारे परिवारापासून हिरावून घेतले. परिवारासाठी हा आघात अत्यंत वेदनादायी होता.या दुःखातून सावरताना ‘रडत बसण्यापेक्षा आपल्या मुलाला शिक्षणाची असलेली आवड विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जिवंत ठेवावी,’ या भावनेतून भिंगारे परिवाराने शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला. कल्पेशच्या पुण्यस्मरणाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा आणि त्याच्या स्मृतींना कायमस्वरूपी जपणारा ठरला.

जाहिरात

याप्रसंगी जेष्ठ कारभारी आगवन, सांडुभाई पठाण, देविदास भिंगारे, संतोष भिंगारे, नवनाथ आगवन, अजय भिंगारे, बंडू आगवन, जयराम चरमळ, साईनाथ भिंगारे, बाळासाहेब भिंगारे, भगवंता भिंगारे, सोपान भिंगारे, गणेश भिंगारे, दादासाहेब भिंगारे, योगेश आगवन, रघु भिंगारे, लक्ष्मण शेळके, पिंटू ढवळे, नामदेव काळे, आण्णा भिंगारे, कैलास गिरी, बाबुराव जाधव, आप्पा भिंगारे, केंद्रप्रमुख पारंडे, गिरीश मुद्गुले, सुरज आहेर, ललित धरम, भीमराज शिंदे, अर्जुन शिंदे यांच्यासह कल्पेशचे वडील अरुण भिंगारे व गोरखनाना भिंगारे यांच्या सह त्यांचा परिवारातील सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते तर य उपस्थितांनी कल्पेशच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असतांना  भावनिक वातावरणात संपूर्ण भिंगारे परिवाराला अश्रू अनावर झाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे