आपला जिल्हा

नगराध्यक्ष पराग संधान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

नगराध्यक्ष पराग संधान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप; शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १७ सप्टेंबर २०२६: वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा उपक्रम नगराध्यक्ष पराग संधान यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला. पराग संधान मित्र मंडळाच्या वतीने मा. माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव येथे विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासोबतच शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्कूल बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

जाहिरात

यावेळी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले, “कोल्हे कुटुंबाची सामाजिक कार्याची शिकवण माझ्या कामाची प्रेरणा आहे. बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. त्याचप्रमाणे स्नेहलताताई कोल्हे आणि आ. विवेकभैय्या कोल्हे यांची समाजाप्रती असलेली सातत्यपूर्ण जाणीव विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्हाला प्रेरणा देते.”

वाढदिवसानिमित्त होणारा प्रत्येक उपक्रम हा केवळ औपचारिक न राहता समाजाच्या उपयोगी पडणारा आणि एखाद्याच्या भविष्यात सकारात्मक बदल घडविणारा असावा, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान देणे गरजेचे असल्याचेही उपस्थितांनी सांगितले.

जाहिरात

या प्रसंगी विजयराव आढाव, मनोज अग्रवाल, संजनाताई उदावंत, प्रसाद आढाव, स्वप्नील मंजुळ, हारुणभाई, रियाज सर, सतीश काकडे, रावसाहेब साठे, कलविंदर दडियाल, रोहित कनगरे, दादा नाईकवाडे, शैलेश नागरे, अशोक वराट, समाधान कुऱ्हे, मनोज इंगळे, शुभम सोनवणे, गौरव आढाव, दुर्गेश गवळी, कृष्णा पडियार, अभिषेक मंजुळ, तोहिद कच्छी, संजय खरोटे, आनंद मोरस्कर, संजय उदावंत, रोहित एरंडे यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे