आपला जिल्हा

राधाबाई काळे कन्या विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

राधाबाई काळे कन्या विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरव

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १९ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्निल वाळुंज, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी व महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, आरोग्य, पोषण, स्वच्छता तसेच सर्जनशीलतेविषयी जागृती निर्माण करणे हा आहे. या अभियानाच्या अनुषंगाने कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्यालयात शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अभियानाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

जाहिरात

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू कोळपे, भिकाजी कोळपे, सुरेगावचे सरपंच वाल्मीक कोळपे व अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना गावित यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापिका केदार मॅडम, जगताप शरद, पर्यवेक्षक किरण चांदगुडे, सुनील सानप, सुभाष आलम, अंगणवाडी सेविका अश्विनी विनायक वाघ, प्रतिभा ठोके, प्रतिभा वाबळे, संगीता क्षीरसागर, विजया कदम, मनीषा मेहेत्रे, कविता निकम, नंदा मेहेरखांब, वनिता पवार, छाया खंडवे, शुभांगी कानडे, राजेश रणवीरकर, वाघमारे सर, मंगेश वाबळे, सुरेखा शेळके, रोहिणी म्हस्के आदी उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी अंगणवाडी सेविका अश्विनी वाघ यांनी नवव्या राष्ट्रीय पोषण अभियानाची माहिती देत विद्यार्थिनींना पोषण, आरोग्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. शरीराच्या योग्य वाढीसाठी सकस व पौष्टिक आहार आवश्यक असून, दैनंदिन आहारामध्ये विविध जीवनसत्त्वे, प्रथिने, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सरपंच वाल्मीक कोळपे, कचरू कोळपे व पर्यवेक्षक किरण चांदगुडे यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच सामाजिक उपक्रम, आरोग्यविषयक जागृती आणि समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अभियानांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी विविध विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारत आपल्या कलात्मकतेसोबतच सामाजिक संदेशही प्रभावीपणे मांडले. रंगांची आकर्षक सांगड, कल्पक मांडणी आणि विषयाची प्रभावी मांडणी यामुळे स्पर्धेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या स्पर्धेत श्रावणी गणेश पानगावणे हिने प्रथम क्रमांक, ईश्वरी संजय गायकवाड हिने द्वितीय क्रमांक, तर सायली नवनाथ पानगव्हाणे व प्राची सुरेश मोकळ यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थिनींना सरपंच वाल्मीक कोळपे यांच्या हस्ते रोख स्वरूपात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

 

‘सेवा संकल्प अभियान’ाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना केवळ शालेय शिक्षण न देता आरोग्य, पोषण, कला, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अभियानाच्या पुढील उपक्रमांमध्येही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे