डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती सत्र
Ahilyanagar vijay kapse दि. १९ सप्टेंबर २०२६ :
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेली जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग, अहिल्यानगर येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या वैद्यकीय-शल्य परिचर्या विभाग व महिला तक्रार निवारण कक्ष (Women Cell) यांच्या वतीने, बी.पी.एच.ई. सोसायटीचे अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र सायबर आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र घेण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐमन अत्तर यांनी आधुनिक आर्थिक फसवणुकीचे प्रकार, लक्ष्यित फसवणूक, प्रवेश व नोकरीच्या आमिषातून होणारी फसवणूक, मोबाईल व इतर उपकरणांची सुरक्षितता, मजबूत संकेतशब्दांचे महत्त्व तसेच सायबर कायद्याच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले. समृद्धी घोरपडे यांनी वास्तविक व आभासी अर्थव्यवस्था, कर्ज अॅप्सच्या माध्यमातून होणारी फसवणूक, सामाजिक माध्यमांवरील संभाव्य धोके आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली.

कार्यक्रमास वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. रामचंद्र पडळकर, प्राचार्य डॉ. प्रतिभा अरुण चांदेकर आणि उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागप्रमुख श्री. अमोल टेमकर, डॉ. निलेश म्हसके, वर्षा शिंदे, पूजा मोरे, प्रमोद सूर्यवंशी, रुशाली कुंजीर, प्रतीक्षा थोरात आणि सुदर्शन पाडेकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रुशाली कुंजीर यांनी केले, तर प्रतीक्षा थोरात यांनी आभार मानले.
सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप आणि डिजिटल व्यवहारातील संभाव्य धोके लक्षात घेता, विद्यार्थ्यांसह सर्व उपस्थितांना सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी समजावून देणारे हे सत्र माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरले.



