आपला जिल्हा

सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी : नितीनराव औताडे

सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी : नितीनराव औताडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सुनेत्रा पवार यांना निवेदन;
स्व चांगदेवराव गणपतराव औताडे विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Kopargaon vijay kapse दि २१ सप्टेंबर २०२६– चालू वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे याला कोपरगाव तालुका ही अपवाद नाही.

जाहिरात

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी केली; मात्र पावसाने पाठ फिरवल्याने मका, सोयाबीन, कपाशी, भाजीपाला तसेच ऊस पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत पिके जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे स्व. चांगदेवराव गणपतराव औताडे पाटील विकास सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ,सूनेत्राताई पवार यांना निवेदन देणार आल्याची माहिती औताडे यांनी दिली. “महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले असून, कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असेही ते म्हणाले.

जाहिरात

स्व. चांगदेवराव गणपतराव औताडे यांनी संस्था चालविताना पारदर्शक व सभासदाभिमुख कारभार केला. त्यांच्या आदर्शाचा वारसा जपत विद्यमान संचालक मंडळ काम करीत आहे. पारदर्शक कारभाराच्या जोरावर संस्थेला सलग ‘अ’ वर्ग मिळत असल्याचे औताडे यांनी सांगितले.
सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वसुबारस ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून सभासदांना मदतीचा हात देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार अग्रो प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्याचे नियोजन आहे. शेतीमालावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनेही पुढील तयारी सुरू असून, भविष्यात ही संस्था सभासदांसाठी अधिक फलदायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र औताडे, उपाध्यक्ष अशोक वाके , संचालक अनिल औताडे , सुनिल बोठे, संजय औताडे, कैलास औताडे, अनिल औताडे, सुनिल हाडके, दिलीप औताडे, सीमाताई औताडे,यमुनाबाई लांडगे, सोमनाथ सोनवणे, नितीन भालेराव तसेच सभासद कैलास औताडे,गणेश औताडे, बाळासाहेब औताडे, भीमा औताडे, गोरक्षनाथ जोंधळे, शंकर औताडे, अशोक औताडे, राजेंद्र औताडे,अरुण डोखे, नवनाथ औताडे, सुनिल आनप, शिवाजी पाचोरे, चंद्रकांत फटांगरे, सोमनाथ वाके, अशोक काकडे, सुकदेव भोजने, प्रमोद वाके, भगवान सोनवणे वसुबारस दुध उत्पादक सभासद जिजाबा डांगे, भगवान सोनवणे, संजय औताडे, प्रशांत रोहमारे, अनिल हाडके, राहुल औताडे, गणेश हाडके,निलेश गवळी, दत्तात्रय डांगे, सचिन घारे, बाळासाहेब शिंदे, दिलीप वाहुळ,अरुण रत्ने, सन फ्रेश ऍग्रो (प्रभात डेअरी)एरिया मॅनेजर अमोल चचरे, प्लॅन्ट इन्चार्ज सूर्यवान सिंग , सुरेश पितळे , ऋषिकेश गोटमारे अदी सह संस्थेचे सभासद उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थी चैतन्य युवराज गायकवाड, जय सुनील भालेराव, कृष्णा अमोल रोहमारे, साई सुभाष सोनवणे, आराध्या महेंद्र रोहमारे, प्राची गणेश पवार, स्वरा सचिन पाचोरे, स्वामिनी सोपान गांगुर्डे आणि सृष्टी विठ्ठल गंडे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विषयपत्रिकेचे वाचन सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी केले, तर आभार संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे