आपला जिल्हा

शालेय विभागीय कराटे स्पर्धेत कोपरगावची श्रावणी गाडे तृतीय

शालेय विभागीय कराटे स्पर्धेत कोपरगावची श्रावणी गाडे तृतीय
शालेय विभागीय कराटे स्पर्धेत कोपरगावची श्रावणी गाडे तृतीय
आभार जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ नोव्हेंबर २०२४– नुकतीच पुणे येथील येरवडा येथे झालेल्या शालेय विभागीय कराटे स्पर्धा संपन्न झाली यात अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या तीन जिल्ह्यातील, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या स्पर्धकांनी या विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता यात कोपरगाव येथील श्रावणी संजय गाडे हिने तृतीय क्रमांक मिळवत नावलौकिक मिळविला आहे.

जाहिरात देवकर
 श्रावणी हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम येऊन तिची या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या पूर्वीही श्रावणीने शालेय तायक्वांडो खेळात विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला होता. श्रावणी सध्या कोपरगाव शहरातील के.जे. सोमैय्या महाविद्यालयात १२ वी इयत्तेत शिकत आहे.या यशामुळे तिला १२ वी बोर्ड परीक्षेत खेळाडूसाठी राखीव असलेले १० वाढीव गुण मिळणार आहेत. श्रावणीला कराटे व तायक्वांडो खेळाचे प्रशिक्षक प्रा. सुदर्शन पांढरे,ॲड. स्नेहल पांढरे,सरस ठोळे, शितल मंजुळ, सप्तमी डहारे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रावणीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात पहाडे
जाहिरात लकारे
जाहिरात लहिरे
जाहिरात निखाडे
जाहिरात जगताप
जाहिरात म्हस्के
जाहिरात जोशी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे