१० वी ते पदवीधर युवकांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी; तहसीलदार महेश सावंत यांचे आवाहन
१० वी ते पदवीधर युवकांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी; तहसीलदार महेश सावंत यांचे आवाहन
१० वी ते पदवीधर युवकांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी; तहसीलदार महेश सावंत यांचे आवाहन
Kopargaon vijay kapse दि २७ सप्टेंबर २०२६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांच्या विद्यमाने मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार महाकुंभ संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक, कोपरगाव तसेच गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध आस्थापना व उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, पात्र युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभवाच्या आधारे रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशीतील १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक युवकांनी या रोजगार महाकुंभात सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.

रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, बायोडाटा तसेच आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



