आपला जिल्हा

मोबाईल कमी वापरून पुस्तकाशी मैत्री करा; साहित्यामधून जीवनाला संस्कार व समृद्धता मिळते — डॉ संजय कळमकर  

मोबाईल कमी वापरून पुस्तकाशी मैत्री करा; साहित्यामधून जीवनाला संस्कार व समृद्धता मिळते
— डॉ संजय कळमकर

१०१ वे साहित्य संमेलन संगमनेर मध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न- दुर्गा तांबे : संगमनेर मध्ये बालकुमार साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात

Sangmner vijay kapse दि २८ सप्टेंबर २०२६-संगमनेर शहर व तालुका ही सांस्कृतिक व वैचारिक अशी समृद्ध भूमी आहे. नवी पिढी ही अधिक समृद्ध होणे गरजेचे आहे. मात्र सध्या मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम जास्त असल्याने विद्यार्थ्यांऐवजी पालकांना संस्कार देण्याची गरज आहे. जीवनाचा पाया अधिक समृद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल कमी वापरून पुस्तकाशी मैत्री करावी असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक व वक्ते डॉ संजय कळमकर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेर मध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुर्गा तांबे यांनी म्हटले आहे.

जाहिरात

महाराष्ट्र साहित्य परिषद,व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री लॉन्स येथे बालकुमार साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी संमेलन अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. तर व्यासपीठावर स्वागत अध्यक्ष दुर्गा तांबे, उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह प्रसाद मिरासदार,  सुवर्णा मालपाणी, डॉ. नितीन संगमनेरकर ,प्रा. बाबा खरात, संगमनेर शाखेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, अनिल सोमणी, अरविंद गाडेकर, दर्शन जोशी, ओंकारनाथ बिहानी,अरुण लेले , डॉ .विवेक वाकचौरे, प्रा शशांक गंधे,चारुदत्त काटकर, प्रा. प्रकाश पारखे,प्राचार्य एस एम खेमनर, उपप्राचार्य सुरेखा दिघे, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

दीप प्रज्वलन करून या बालकुमार साहित्य संमेलन व पुस्तक जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना संमेलनाअध्यक्ष डॉ संजय कळमकर म्हणाले की, संगमनेरला मोठी साहित्यिक परंपरा लाभली आहे. ६४ कला असून त्यापैकी कोणतीतरी एक कला आपल्याला अवगत असते ती ओळखून त्यामध्ये तुम्हाला करिअर करता येते. सध्या मोबाईलचा अतिवापर वाढला असून त्याचे दुष्परिणाम जाणू लागले आहेत म्हणून खरे तर पालकांसाठी संस्कार शिबिर घेणे गरजेचे आहे.

जाहिरात

मोबाईल मुळे संवाद होत नाही, गोष्टी बंद झाल्या. अन्न, वस्त्र ,निवारा ऐवजी मोबाईल डाटा इंटरनेट या मूलभूत गरजा झाल्या आहेत. आनंदी राहण्यासाठी मोबाईल टाळून पुस्तकांशी मैत्री करा. मोबाईलमुळे आळशीपणा, स्थूलता वाढत असून डोळे खराब होतात. झोप अधुरी राहते. तर पुस्तकांमधून आनंद मिळतो. जुन्या काळी खरा आनंद होता शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारण्याची मुभा होती विद्यार्थी घडले जायचे आजी आजोबा गोष्टी सांगायचे त्यामधून संस्कार मिळायचे वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जायचा आज मात्र टीव्ही आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये कुटुंब व्यवस्था अडचणीत आली आहे. गरिबी होती म्हणून फाटके कपडे असायचे ते स्वच्छ धुऊन, शिवून घातले जायचे त्यामध्ये आनंद होता आता मात्र श्रीमंती आली आणि महागडे कपडे फाडले जातात ही कुठली फॅशन अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.

तर संमेलन स्वागत अध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, पाच नद्यांचा संगम संगमनेरला झाला असून कभी अनंत फंदी यांच्यापासून विचारवंतांची आणि साहित्यिकांची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक नामवंत साहित्यिक कवी लेखक आज संगमनेरचे नाव साहित्य विश्वातून महाराष्ट्रापुढे आणत आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असते. 2010 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये विजया वाढ व मंगेश पाडगावकर उपस्थित होते. साहित्यामधून संस्कार आणि संस्कृतीचे शिक्षण मिळते.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृत मंथन व अमृत गाथा ही पुस्तके लिहिली त्याबद्दल तालुक्याचा व सहकाराचा इतिहास उभा राहतो. हे साहित्य संमेलन जिल्ह्यामध्ये संगमनेर मध्ये होत असल्याचा अभिमान असून यासाठी संगमनेर साहित्य परिषदेच्या अध्यक्ष अनिल देशपांडे व सर्व सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यामध्ये होत असून 101 वे.साहित्य संमेलन संगमनेर मध्ये घेण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचा त्या म्हणाल्या.

तर डॉ स्वाती महाळंक म्हणाल्या की, शंभरावे साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये होत आहे साहित्य संमेलनाची शंभरी होणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदी असून राज्यभरात 99 नांदी साहित्य संमेलन घेतली जात आहे विद्यार्थ्यांनी स्वतःची एक गोष्ट लिहावी असे सांगताना वाचनाने व ऐकण्याने मन समृद्ध होते असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालकुमार साहित्य शाखेचे संगमनेर अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी केले .सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती नरवडे यांनी केले तर डॉ. विवेक वाकचौरे यांनी आभार मानले. या साहित्य संमेलनात दिवसभरात बोलक्या बाहुल्या हा मनोरंजनाचा कार्यक्रम त्यागराज खाडिलकर व दीपिका जोग यांचा अक्षर गाणी हा कार्यक्रम पुस्तक प्रदर्शन संगीतमय कविता गायन माहितीपट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर मधील साहित्यिक, लेखक, कवी, प्राचार्य शिक्षक व 24 शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

१०१ वे साहित्य संमेलन संगमनेर मध्ये घेण्यासाठी प्रयत्न

शंभरावे साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये होत आहे. साहित्यातून समृद्धी निर्माण होत असून संगमनेर शहर व तालुक्याला साहित्यिका विचारवंतांचा मोठा वारसा आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली १०१ वे साहित्य संमेलन संगमनेर मध्ये घेण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची संमेलनाच्या स्वागताध्यक्ष दुर्गा तांबे यांनी म्हटले असून यावेळी उपस्थित सर्व साहित्यिक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे