आपला जिल्हा

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व कॉलेजच्या तीनही संघांचा दणदणीत विजय

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व कॉलेजच्या तीनही संघांचा दणदणीत विजय
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व कॉलेजच्या तीनही संघांचा दणदणीत विजय
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २८ सप्टेंबर २०२६–

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विदयमाने तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन सह्यादी जूनियर कॉलेज, संगमनेर येथे करण्यात आले. या स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षे मुले, १९ वर्षे मुले आणि १९ वर्षे मली या तिन्ही गटांतील संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य आशिष कुमार यांनी दिली आहे.

जाहिरात

 
     याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धांमध्ये घडणारे विद्यार्थी तयार व्हावे यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे त्याचाच एक भाग म्हणून १७ वर्षे मुले या गटात कर्णधार पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भूषण चव्हाण, प्रेम गवळी, अथर्व देवरासे, आयुष खाने, रोहित गायकवाड, मेघराज भोये. साई चौरे, हिमांश भरसाट, प्रशांत महाले, अमित घारे व सुरज बन्सी यांनी उत्कृष्ट खेलाचे प्रदर्शन केले संघाने अंतिम सामना जिंकत प्रथम क्रमांक मिळवला.

जाहिरात

१९ वर्षे मुले या गटात कर्णधार धनेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली कल्पेश सातपुते, ओंकार गीते, अतुल आवारी, यशराज देशमुख, सौरभ टोपले, वेदांत महाले, निखिल गायकवाड, राजू अवतार, तुकाराम गावित, चंदू पीठे व राधेश्याम सुतार यांनी संघाला प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळवून दिले.

तर १९ वर्षे मुली या गटात कर्णधार अश्विनी भोये यांच्या नेतृत्वाखाली जागृती सातपुते, कावेरी चौधरी, जानवी चौधरी, जयश्री धूम, योगेश्वरी भोये, निशा पवार, मयुरी पवार, लीना भरसट, कविता शिंदे व मृणाल भालेराव यांनी शानदार कामगिरी करत अंतिम सामना जिंकला आणि प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे नाव उज्वल केले.

         या  वि‌द्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक रविंद्र कदम, रोहित गाडे, जयराम दूशिंग व वृषाली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, शाळेचे प्राचार्य आशिष कुमार, सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे