आपला जिल्हा

नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या आ.विवेक कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना

नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या आ.विवेक कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना
नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या आ.विवेक कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना
Kopargaon vijay kapse दि २८ सप्टेंबर २०२६–पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्याचे नाव दुष्काळ यादीत आलेले असून बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी सूचना आमदार विवेक कोल्हे यांनी प्रशासनला केली आहे.

जाहिरात
खरीप हंगामातील Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुधारित सूचनांचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील पंचनामे तातडीने करण्याची सूचना कोल्हे यांनी प्रशासनाला केली आहे तसेच शेतकऱ्यांना कुठे अडचण येत असेल तर त्या संदर्भात सहकार्य करून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब करू नये असेही सांगितले आहे.

जाहिरात
या पत्रानुसार Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या सोप्या जोडलेल्या सुधारित प्रपत्रात पंचनाम्याची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.पंचनाम्याच्या अहवालामध्ये AgriStack Farmer ID घेण्यात यावा. शेतकऱ्याचा Farmer ID उपलब्ध नसल्यास UID/आधार क्रमांक संकलित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील पावसाअभावी तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष शेतावर जाऊन तातडीने पूर्ण करावेत, अशी सूचना आमदार विवेक कोल्हे यांनी प्रशासनाला केली आहे.

जाहिरात
पंचनाम्याची कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी मदत व इतर संबंधित उपाययोजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुढे नेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी कोपरगाव तालुक्यातील पंचनाम्याची कार्यवाही विलंब न करता पूर्ण करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे