आपला जिल्हा

संजीवनी फार्मसी महाविद्यालयात नवागतांचे स्वागत; बदल स्वीकारून स्वतःला अद्ययावत ठेवा – क्रिष्णाकुमार नेलनथुला

संजीवनी फार्मसी महाविद्यालयात नवागतांचे स्वागत; बदल स्वीकारून स्वतःला अद्ययावत ठेवा – क्रिष्णाकुमार नेलनथुला

संजीवनी फार्मसी महाविद्यालयात नवागतांचे स्वागत; बदल स्वीकारून स्वतःला अद्ययावत ठेवा – क्रिष्णाकुमार नेलनथुला

जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्ये, तंत्रज्ञान आणि जीवनमूल्ये आत्मसात करावीत

Kopargaon vijay kapse दि २१ ऑक्टोबर २०२६ : “आज शिकलेले ज्ञान उद्या कालबाह्य ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बदल स्वीकारून स्वतःला सतत अद्ययावत ठेवावे. तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात त्याचा योग्य वापर करत, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून मोठ्या आकांक्षा बाळगाव्यात आणि जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावे,” असे आवाहन अ‍ॅपोटेक्स इंडिया कंपनीचे डायरेक्टर एचआर  क्रिष्णाकुमार नेलनथुला यांनी केले.

जाहिरात

संजीवनी फार्मसी महाविद्यालयात डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि एम. फार्मसी प्रथम वर्षातील नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ व अभिमुखता कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

यावेळी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, कॉर्पोरेट रिलेशन्स विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. इम्राण शेख, डॉ. प्रमोद कडू आणि डॉ. दीपक मुसमाडे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

जाहिरात

प्रारंभी डॉ. विपुल पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या विविध यशांची आणि प्रस्थापित केलेल्या कीर्तिमानांची माहिती दिली. यावेळी श्री. इम्राण शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालयीन जीवन महत्त्वाचे

श्री. नेलनथुला पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवन हे केवळ पदवी मिळविण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व विकासाची आणि भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला घडविण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. या काळात विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्ये आणि जीवनमूल्ये आत्मसात करावीत. शिस्त पाळावी, नैतिक मूल्ये जपावीत आणि चुकीच्या गोष्टींबाबत कोणतीही तडजोड करू नये.

बदल स्वीकारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि प्रत्येक आव्हानाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहावे. सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम आणि चारित्र्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. यश मिळाल्यानंतर नम्रता जपावी, तर अपयशातून शिकून पुढे जाण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक घडामोडी आणि नवतंत्रज्ञानाचे ज्ञान घेताना भावनिक बुद्धिमत्ता व बौद्धिक क्षमतांचा समतोल राखणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर विचार करावा; मात्र प्रत्यक्ष कृती करताना स्थानिक गरजा आणि परिस्थितीचे भान ठेवावे. या गुणांच्या बळावर सक्षम व्यक्तिमत्त्व घडवून व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी संजीवनीचा पुढाकार

संजीवनी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याची दूरदृष्टी होती. त्याच विचारांचा वारसा संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे पुढे सुरू आहे.

ग्रामीण भागात असूनही संजीवनी फार्मसी संस्था ही विनाअनुदानित वर्गवारीतील महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील नववी स्वायत्त दर्जा प्राप्त संस्था आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी जपानी, स्पॅनिश, जर्मन आणि चिनी या परदेशी भाषांचे ज्ञान मिळवावे. तसेच आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधींचा लाभ घेऊन जागतिक स्पर्धेसाठी स्वतःला सक्षम बनवावे. लिंक्डइनसारख्या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून व्यावसायिक नेटवर्क वाढवावे. यामुळे कर्तृत्ववान व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करण्यास आणि जागतिक स्तरावरील संधी मिळविण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी केले.

 

 

 

संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे हे डायरेक्टर एचआर श्री क्रिष्णाकुमार नेलनथुला यांचा सत्कार करताना. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे