आपला जिल्हा

निवडणूक आयोगाच्या कारभाराचा कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी व मित्रपक्षांच्या वतीने निषेध 

निवडणूक आयोगाच्या कारभाराचा कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी व मित्रपक्षांच्या वतीने निषेध 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या!

कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी व मित्रपक्षांचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन; मागण्यांचे निवेदन सादर

Kopargaon vijay kapse दि २१ ऑक्टोबर २०२६ : निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभाराचा निषेध करून त्यावर अंकुश आणावा, तसेच दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी व मित्रपक्षांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार  प्रफुल्लिता सातपुते यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

जाहिरात

तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांची भरपाई तातडीने जाहीर करून मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

जाहिरात

याशिवाय, निवडणूक प्रक्रियेदरम्यान तसेच प्रशासकीय कामकाजात निवडणूक आयोगाकडून होत असल्याचा आरोप असलेल्या मनमानी व संशयास्पद कारभारावर तातडीने नियंत्रण आणावे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

या आंदोलनात कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नितीन मनोहर शिंदे, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिवरकर, सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणराव होन, संजय त्रिभुवन आणि राहुल गवळी आदी उपस्थित होते.

जाहिरात

तसेच मित्रपक्ष कॉकरोच जनता पार्टी व आर.पी.आय. ऑफ इंडिया (गायकवाड गट) यांच्याकडून दिलीप गायकवाड, अर्जुन मोरे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळाली नाही आणि प्रशासकीय कारभारात सुधारणा झाली नाही, तर आगामी काळात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे