आपला जिल्हा

तालुक्यात प्रथमच कोपरगाव टर्फ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 

तालुक्यात प्रथमच कोपरगाव टर्फ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 
तालुक्यात प्रथमच कोपरगाव टर्फ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ मार्च २०२४कोपरगाव तालुका हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची पंढरी असून अनेक नामवंत आणि उच्चकोटीचे खेळाडू कोपरगाव तालुक्यात आहेत. आपल्या कौशल्य पूर्ण खेळातून कोपरगावचे नाव महाराष्ट्रच्या कान्याकोपऱ्यात उज्ज्वल केलं आहे. कोपरगावतील क्रिकेट खेळाडुंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावा रुपाला यावे तसेच क्रिकेट स्पर्धेतील नवीन प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने कोपरगाव तालुक्यात प्रथमच बॉक्स टर्फ क्रिकेट अर्थात कोपरगाव टर्फ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मिस्टरी इव्हेंट्सचे ऋषभ तपसे, निखिल खूबानी, शुभम मनोज अग्रवाल, प्रशील ठोळे, सनी आव्हाड, विक्रम मुंदडा यांच्या वतीने करण्यात आले असून या बॉक्स टर्फ क्रिकेट लीग स्पर्धेचे हे पहिलेच पर्व आहे. नुकताच या स्पर्धेचा खेळाडूंचा ऑक्शन सोहळा शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

जाहिरात

सदर ऑक्शन सोहळ्यात शेट्टीस स्वस्तिक चॅम्पियन, रेनबो इंडियनस, युनिटी वॉरियर्स, होडे थंडरर्स, कृष्णानी   नाईट राईडर्स, हाऊस ऑफ स्टार्क्स, काले रॉयल, दिवाईन डायमाईटस,कॅफे    स्पोर्ट्स मवेरीकस, महाराजा सुपर किंगस असे एकूण १० संघ सहभागी झाले होते. यात जवळपास १५० खेळाडूसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली असून यात ९० खेळाडूना वरील संघांनी खरेदी केले आहे. सदर स्पर्धा १५ ते १७ मार्च दरम्यान शहरातील संजिवनी कॉलेजच्या मागे असलेल्या स्ट्राईक झोन टर्फ या ठिकाणी सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यत संपन्न होणार आहे.

जाहिरात
समता पतसंस्था कोपरगाव या स्पर्धेचे प्रायोजक असून सहप्रायोजक : एसजेएस हॉस्पिटल आहे. तर सदर स्पर्धेसाठी भन्साळी ऍग्रोटेक,जयहिंद सायकल मार्ट, पांडे स्वीट, कलश रेडिमेट,विसपुते सराफ, द लक्ष्मी केमिकल यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती आयोजकांनी सांगत जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे