कोपरगावात ५ वाजेपर्यंत १ लाख ९० हजार मतदारांनी केले मतदान
कोपरगावात ५ वाजेपर्यंत १ लाख ९० हजार मतदारांनी केले मतदान
शिल्लक राहिला अवघा एक तास
कोपरगाव विजय कापसे दि २०नोव्हेंबर २०२४– बहुचर्चित अशी महाराष्ट्र विधानसभेसाठी आज २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी मतदान होत असुन महायुती (भाजपा,शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेंच महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) या प्रमुख आघाड्यामध्ये निवडणूक होत असून २३ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी संपूर्ण राज्यात मतमोजणी होणार आहे.
आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेत कोपरगाव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ३३७ स्त्री मतदार १ लाख ४३ हजार ४१३ तर तृत्तीय पंथीय ६ मतदार असे एकूण २ लाख ८९ हजार ६५६ मतदार असून आज ५ वाजेपर्यंत ९७ हजार ४२३ पुरुष मतदारांनी,९३ हजार १६२ स्त्री मतदारांनी तर ३ तृतीयपंथीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत आता पर्यंत १ लाख ९० हजार ५८८ मतदारांनी मतदान केले असून एकूण कोपरगाव विधानसभा मतदार संघात ५ वाजेपर्यंत ६५.८० टक्के इतके मतदान झाले आहे.