सुरेगावात मतदान जनजागृती करीता विविध उपक्रम राबवत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन
सुरेगावात मतदान जनजागृती करीता विविध उपक्रम राबवत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन
सुरेगावात मतदान जनजागृती करीता विविध उपक्रम राबवत १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन
कोपरगाव विजय कापसे दि १८ नोव्हेंबर २०२४– महाराष्ट्र राज्य विधानसभेकरीता बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न होत असून या करिता जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी शासन स्तरावर वेगळे उपक्रम राबवत मतदान जनजागृती केली जात असून यात पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हात देखील विविध उपक्रम राबवले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून कोपरगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संतोष राऊत, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे सुरेगाव ग्रामपंचायत, एकात्मिक बालविकास सेवा योजना तसेच राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला रोख रक्कम ५०० रुपये, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला ३०० रुपये आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला २०० रुपये तसेच ५ उत्तेजनार्थ स्पर्धकांना कंपास बॉक्सचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. तसेच गावातील अंगणवाडी व अशा सेविकांनी घरोघरी जात मतदानाचे महत्त्व सांगत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले.
या प्रसंगी राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मतदान जनजागृती करण्यासाठी रेखाटलेल्या रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकत शबासकी मिळवली.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी सुरेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दिगंबर बनकर, राधाबाई काळे काळे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एच .एन गुंजाळ, अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना गावित यासह अश्विनी वाघ, प्रतिभा ठोके, प्रतिभा वाबळे ,संगीता क्षीरसागर, छाया मेहरखाब, नंदा मेहरखाब, विजया कदम, वनिता पवार, कविता निकम, शुभांगी कानडे, मनीषा मेहेत्रे आदी अंगणवाडी, आशा सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.