कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता ९ वाजेपर्यंत इतके झाले मतदान
कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता ९ वाजेपर्यंत इतके झाले मतदान
कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता ९ वाजेपर्यंत इतके झाले मतदान
कोपरगाव विजय कापसे दि २० नोव्हेंबर २०२४– बहुचर्चित अशी महाराष्ट्र विधानसभेसाठी आज २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी मतदान होत असुन महायुती (भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेंच महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) या प्रमुख आघाड्यामध्ये निवडणूक होत असून २३ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी संपूर्ण राज्यात मतमोजणी होणार आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील महायुती व महाविकास आघाडी मध्ये प्रमुख लढत होत असून यात महायुती कडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार आशुतोष काळे व महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संदीप वर्पे यांच्या राष्ट्रवादी व राष्ट्रवादी मध्ये सरळ लढत होत आहे.
आज होत असलेल्या या मतदान प्रक्रियेत कोपरगाव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ३३७ स्त्री मतदार १ लाख ४३ हजार ४१३ तर तृत्तीय पंथीय ६ मतदार असे एकूण २ लाख ८९ हजार ६५६ मतदार असून आज सकाळी ९ वाजेपर्यंत १२ हजार ५९६ पुरुष मतदारांनी तर ६ हजार ४१० स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत आता पर्यंत १९ हजार ६ मतदारांनी मतदान केले असून एकूण कोपरगाव विधानसभा मतदार संघात ९ वाजेपर्यंत ६.५६ टक्के इतके मतदान झाले आहे.
मतदान करायला जाताना मोबाईल कॅमेरा घेऊन जाऊ नये