आपला जिल्हा

कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता ११ वाजेपर्यंत इतके झाले मतदान

कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता ११ वाजेपर्यंत इतके झाले मतदान
मतदान करा आपला हक्क व्यक्त करा;
मोबाईल कॅमेरा घेऊन जाऊ नका
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २०नोव्हेंबर २०२४बहुचर्चित अशी महाराष्ट्र विधानसभेसाठी आज २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी मतदान होत असुन महायुती (भाजपा,शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेंच महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) या प्रमुख आघाड्यामध्ये निवडणूक होत असून २३ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी संपूर्ण राज्यात मतमोजणी होणार आहे.

जाहिरात

कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील महायुती व महाविकास आघाडी मध्ये प्रमुख लढत होत असून यात महायुती कडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार आशुतोष काळे व महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संदीप वर्पे यांच्या राष्ट्रवादी व राष्ट्रवादी मध्ये सरळ लढत होत आहे.

जाहिरात

आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेत कोपरगाव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ३३७ स्त्री मतदार १ लाख ४३ हजार ४१३ तर तृत्तीय पंथीय ६ मतदार असे एकूण २ लाख ८९ हजार ६५६ मतदार असून आज सकाळी ११ वाजेपर्यंत ३६ हजार ३४१ पुरुष मतदारांनी तर २५ हजार १ स्त्री मतदारांनी तसेच १ तृतीय पंथीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत आता पर्यंत ६१ हजार १११ मतदारांनी मतदान केले असून एकूण कोपरगाव विधानसभा मतदार संघात ११ वाजेपर्यंत २१.१० टक्के इतके मतदान झाले आहे.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे