एस.जी विदयालयाचे दिलीप कुडके यांचा मराठी अध्यापन सेवा पुरस्काराने सन्मान
एस.जी विदयालयाचे दिलीप कुडके यांचा मराठी अध्यापन सेवा पुरस्काराने सन्मान
कोपरगाव विजय कापसे दि ५ मार्च २०२४– कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील दिलीप कुडके यांचा मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने मराठी ग्रामीण साहित्य संमेलानात ज्ञानज्योती बहुउदृशीय संस्थेच्या वतीने मराठी भाषेची निगडित सेवा प्रसार व संशोधनकार्याच्या अनमोल योगदाना बद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिलीप कुडके हे एस जी विदयालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असुन त्यांनी स्काऊट आणि गाईड मध्ये देखिल चांगले काम केले आहे.त्यांच्या या यशा बद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिनअजमेरे, संदीपअजमेरे, डॉ.अमोल अजमेरे, राजेश ठोळे, आनंद ठोळे, मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षक उमा रायते आदी सह विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली असुन मराठी भाषेसाठी चांगले कार्य करण्याची संधी मिळाली असल्याचे मत एस.जी विदयालयाचे क्रीडा शिक्षक मराठी अध्यापन सेवा पुरस्काराने सन्मानित झालेले दिलीप कुडके यांनी सांगितले आहे.