आपला जिल्हाकाळे गट

करंजी परिसराची आमदार काळे यांनी तात्काळ पाहणी करत प्रशासनाला दिल्या पंचनाम्याच्या सूचना

करंजी परिसराची आमदार काळे यांनी तात्काळ पाहणी करत प्रशासनाला दिल्या पंचनाम्याच्या सूचना

पढेगाव-करंजी येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची; आ.आशुतोष काळेंनी पाहणी करून तहसीलदारांना पंचानाम्याच्या दिल्या सूचना

    जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ मे २०२४:-कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील संपूर्ण करंजी परिसराला गुरुवारी दुपारी दोन वाजता अचानक आलेल्या मुसळधार पावसासह वादळी वारा व गारांचा मोठ्या फटका बसल्याने नैसर्गिक मोठे नुकसान झाले असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.सुमारे एक तास सुरू असलेल्या मुसळधार पावसासह असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने मोठ्या प्रमाणात परिसरातील अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने जिकडे तिकडे जमीनोधस्त झालेली झाडेच बघायला मिळत होती .अनेकांच्या पत्र्याच्या शेडवर देखील झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणचे पत्रे उडून गेले पण मिळालेल्या माहितीनुसार कुठेही जीवित हानी झाली नाही तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा करणाऱ्या तारा तुटून पडल्या होत्या तसेच अनेकांच्या आंब्याच्या झाडाखाली आंब्यांचा व कैऱ्यांचा खच पहावयास मिळत होता सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी अवघ्या अर्ध्या तासात  करंजी पढेगाव गाठत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वादळामुळे पढेगाव-करंजी गावात अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर चाळीत साठवलेल्या कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे विजेचा प्रवाह देखील खंडीत होवून विजेच्या पोलांचे व वीज वाहिन्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.याबाबतची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जाहिरात– पीटर इंग्लंड , कोपरगाव स्टोअरच्या GRAND ANNIVERSARY साठी आपणास खास आमंत्रण आणि यानिमित्त तुम्हाला एक खास ऑफर देत आहोत. आत्ताच भेट द्या आणि मिळवा प्रत्येक 1000 च्या खरेदीवर 500 ची सूट, संपर्क– ०२४२३-२९९२६१.पत्ता – अण्णाभाऊ साठे चौकाजवळ, येवला रोड, कोपरगाव.

आमदार काळे यांनी करंजी व पढेगाव येथील नुकसान  झालेल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली व घरातील सदस्या सोबत आपुलकीने संवाद साधून विचारपूस केली.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असून त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान देखील होत आहे. यातून कोपरगाव तालुका देखील सुटला नसून मागील दोन दिवसापासून कोपरगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पडल्यामुळे काही जनावरे देखील दगावली आहे. अशातच सलग दुसऱ्यांदा गुरुवार (दि.१६) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पढेगाव-करंजी गावात अवकाळी गारांचा पाऊस व झालेल्या वादळामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान होवून यात दोन महिला देखील जखमी झाल्या असून त्यांना कोपरगाव शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे देखील नुकसान होवून साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे

करंजी व पढेगाव परिसरातील अंदाजे ३५० हुन अधिक लहान मोठ्या झाडाचे नुकसान झाले आहे तर कित्येक झाडे उन्मळून पडली आहे तसेच करंजी कॅनॉल च्या कडेला फटांगरे वस्ती जवळ असलेले जवळपास १०० वर्षांपूर्वीचे प्राचीन झाड देखील या वादळात जमीनोधोस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सदर घटनेची आ. आशुतोष काळे यांनी स्वत: जातीने पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेत नुकसानग्रस्त नागरिकांची व शेतकऱ्यांची भेट घेवून त्यांचे सात्वन केले आहे. तसेच तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना मदत पुनर्वसन विभागाला झालेल्या घटनेची माहिती पाठवावी अशा सूचना देवून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोवर्धन परजणे, करंजी गावचे सरपंच रविंद्र आगवन, कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक संजय आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन, शिवाजी करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडियाचे संघटक गोपाळ कुलकर्णी आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे