कोपरगावातील युवकाचा शॉक लागून शिर्डीतील हॉटेल कॉम्प्लेक्स मध्ये मृत्यू;सर्वत्र हळहळ
महावितरण कंपनी सह तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव विजय कापसे दि १८ मे २०२४– कोपरगाव शहरातील निवारा हाऊसिंग सोसायटी येथे राहणारा अभय संजय पोटे या २१ वर्षीय युवकाचा दि ११ मे रोजी शिर्डी येथील हॉटेल कलासाई कॉम्प्लेक्स मध्ये ए.सी बसविताना उच्च विद्युत दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अभयचे वडील संजय बाबुराव पोटे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये १७ मे रोजी तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील रहिवाशी संजय पोटे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये १७ मे रोजी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, माझा धाकटा मुलगा अभय हा गेल्या १ वर्षापासून तुषार जयप्रकाश होडे व सुरज जयप्रकाश होडे यांच्या होडे रेफ्रिजरेशन व एयर कंडीशनिंग नावाच्या दुकानात ए.सी टेक्निशियन म्हणून काम करत होता त्याच्या मालकाच्या म्हणजे होडे बंधूंच्या सांगण्यावरून ११ मे रोजी शिर्डी येथील हॉटेल कलासाई कॉम्प्लेक्स मध्ये एसी बसवण्याचे काम करत असताना विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे माझा मुलगा अभय याचा सदरच्या इमारती जवळून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीतून विजेचा धक्का लागून दुपारी २.३० वाजता मृत्यू झाला.

विद्युत वितरण कंपनी आणि संबंधितांच्या हलगर्जीपणामुळेच माझा मुलगा अभय पोटे याचा मृत्यू झाला अशा फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये वीज वितरण कंपनी सह, तुषार होडे, संजय होडे राहणार राम मंदिराजवळ कोपरगाव तसेच एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३१९/२०२४ भारतीय दंड संहिता भांदवी कलम ३०४ (ए) व ३४ प्रमाणे शिर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहे.

मृत अभय संजय पोटे हा घरातील सर्वात धाकटा व करता मुलगा होता घरातील सर्व जबाबदारी ही अभयाच्याच खांद्यावर होती तर अभयचे वडील संजय पोटे व आई सरला पोटे हे सतत आजारी असतात तर अभयचा भाऊ प्रतीक हा देखील मोलमजुरी करत असतो त्यामुळे संजय पोटे यांच्या घरातील कमावता कर्ता मुलगा अभयचा अचानकपणे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे.




