ज्यांनी आपल्या मनाला समजावलं त्यांचाच या जगात सन्मान होतो- महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज
ज्यांनी आपल्या मनाला समजावलं त्यांचाच या जगात सन्मान होतो- महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज
ज्यांनी आपल्या मनाला समजावलं त्यांचाच या जगात सन्मान होतो- महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज

कोपरगाव विजय कापसे दि १८ मे २०२४– जगाला उपदेश करणे सोपे आहे परंतु आपल्या मनाला उपदेश करणे अवघड असते.या जगात ज्यांनी आपल्या मनाला समजावलं त्यांचाच समाजात मान,सन्मान आणि पूजन होते.ते त्रीलोक्याचे स्वामी होतात.जे आपल्या मनाचे गुलाम होतात ते त्रीलोक्याचे ही गुलाम होतात असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांनी केले आहे.

तालुक्यातील कान्हेगाव येथे जपाणुष्टाण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रवचन प्रसंगी ते भाविकांना उपदेश करतांना ते बोलत होते.

जो मनाच्या मायाजालात गुंततो त्यांना काळ खातो.जे आई वडिलांना सांभाळत नाही,पत्नीचा सन्मान करीत नाही,मुलांना शिक्षण व चांगले संस्कार देत नाहीत.त्यांचा हा समाज तिरस्कार करतो. व्यसन करणारांची निंदा होते.जगात अनेक संत झाले.त्यांचे ध्येय एकच असते भगवंताचे दर्शन व्हावे.संताची वाणी ऐकल्याने व दर्शनाने पापी माणसांचा उध्दार होतो. आपल्या कुळाचा, गावाचा,देशाचा उध्दार झाला पाहिजे.ईश्वराच्या भजनात आणि संताच्या संगतीत सुख आहे असे महाराजांनी यावेळी सांगितले.

सदर सत्संग प्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी वारी, भोजडे ,रामवाडी, संवत्सर, धोत्रे, तळेगाव, अंदरसुल, सडे आदीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन काजळे, संदीप काजळे, अशोक काजळे, संदीप वाळुंज, आप्पासाहेब काजळे, राजेंद्र सांगळे, वसंतराव भाकरे ,अरुण भाकरे ,पत्रकार जनार्दन जगताप यांचेसह सर्व तरुण मंडळ परिश्रम घेत आहेत.



