संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य सद्गुरूच्या आशीर्वादानेच – माजी आ.स्नेहलता कोल्हे
संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य सद्गुरूच्या आशीर्वादानेच – माजी आ.स्नेहलता कोल्हे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २३ मे २०२४– राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा आशीर्वाद स्व.कोल्हे साहेब यांच्या बरोबर होता म्हणूनच ते मोठे कार्य करू शकले .जीवन जगत असताना अनेक संकटे येत असतात त्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य सद्गुरूच्या आशीर्वादानेच मिळते असे प्रतिपादन माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी तालुक्यातील कान्हेगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास दिलेल्या भेटी प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
जाहिरात
या प्रसंगी कोल्हे पुढे बोलताना म्हणाल्या की, आपले भाग्य आहे की,संत जनार्दन स्वामींची समाधी कोपरगाव येथे आहे.ही समाधी एक शक्ती स्थळ आहे.महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज हे देशसेवेचे,धर्माचे,समाजसेवेचे,राष्ट्र सेवेचे कार्य करीत आहेत .गुरुचरणीच देव आहे.आपल्या भक्ताचे दुःख नष्ट व्हावे अशीच गुरूची इच्छा असते.आपल्या गावात चालू असलेल्या सत्संगामुळे प्रत्येकाच्या घरात एक चैतन्य निर्माण झाले असेल.आपल्या मनात एक सकारात्मक भाव निर्माण झाला असेल म्हणून गुरुचरणी नतमस्तक व्हा असे आवाहन त्यांनी भाविकांना केले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.