आत्मा मालिक गुरुकुलात विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात
आत्मा मालिक गुरुकुलात विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात
शनिवार दि १५ जुन पासुन नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात

येवला प्रतिनिधी दि १६ जुन २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला चे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणातून गुरुकुलात विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य तुषार कापसे,मठाधिपती संत चरणदासजी महाराज व पालक उपस्थित होते. नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ध्यानाने व सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या आरतीने झाली.

प्राचार्य तुषार कापसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकारे अभ्यास करायचा आहे व गुरुकुलाचा नावलौकिक करायचा आहे असे सांगितले.त्याचबरोबर सर्व नियम व शिस्त देखील पाळावी अशी सूचना दिली. सोनाली घोडके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व गुरुकुलाचे नियम सांगितले.

प्रत्येक वर्गाच्या वर्गशिक्षिकेने आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे औक्षण केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा जोरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



