आपला जिल्हा

सौ. सुशीलामाई काळे  भोजडे विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सौ. सुशीलामाई काळे  भोजडे विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

शनिवार दिनांक १५ जुन पासून नविन शैक्षणिक वर्ष सुरू

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुन २०२४कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील  सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक वि‌द्यालयात शनिवार दि १५ जुन २०२४ रोजी नविन विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, गेल्या दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नंतर शनिवार दिनांक १५ जुन पासुन  रयत शिक्षण संस्थेच्या सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक वि‌द्यालयात उन्हाळी सुट्टीनंतर आंनदी वातावरणात विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून वि‌द्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक अशी रांगोळी काढून सजावट करत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी  प्रमुख पाहण्यांच्या हस्ते  क्रमिक पुस्तकांबरोबर गुलाबपुष्प व पेन देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष  भाऊसाहेब बाळासाहेब सिनगर, स्कूल कमिटी सदस्य प्रकाश  गायकवाड, सरपंच  सुधाकरजी वादे, माजी उपसरपंच वाल्मिक  सिनगर, आदी सह शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे व स्कुल कमिटी सदस्य  प्रकाश  गायकवाड आदींनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करत सर्वाना आशीर्वाद दिले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक गोरे सर यांनी केले तर शालेय शिक्षक चव्हाण सर, साबळे मॅडम, शिंदे सर,  सुराळकर मॅडम, शेख मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी सय्यद सर,  पंडित मामा व  शिवाजी मामा यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले तर  शेवटी उपस्थितांचे आभार शालेय शिक्षक माळोदे सर यांनी मानले.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे