आपला जिल्हा
विजेच्या गलथान कारभार विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले वीज कनेक्शन सुरू करा – डॉ.जयश्रीताई थोरात

विजेच्या गलथान कारभार विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले वीज कनेक्शन सुरू करा – डॉ.जयश्रीताई थोरात

संगमनेर विजय कापसे दि १३ मार्च २०२६– राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दाबाने व अवेळी वीज मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा परीक्षांचा काळ सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद होत आहे. भर उन्हाळ्यामध्ये ग्रामपंचायतींसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट केल्याने अनेक नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे या सर्व गलथान कारभार विरोधात डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने वीज कार्यालयात ही आंदोलन करण्यात आले.