सौ सविता विधाते

श्रमिक मजदुर संघाच्या शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे व निषेध आंदोलन

श्रमिक मजदुर संघाच्या शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे व निषेध आंदोलन

श्रमिक मजदुर संघाच्या शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे व निषेध आंदोलन

जाहिरात

श्रीरामपूर प्रतिनिधी दि १० ऑगस्ट २०२४ – भारतातील सर्वांत कमी पगारावर काम करणारा वर्ग म्हणजे शालेय पोषण आहार कर्मचारी २५०० रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर  सध्या काम करत आहेत.हे काम करत असताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.श्रीरामपूर तालुक्यात १६ वर्ष  ३०० रुपये महिन्यांपासून ज्या महिला काम करत होत्या त्यांना अचानक कामावरून काढून टाकले आणि १३ माध्यमिक शाळा मिळून एक ठेकेदार नेमला आहे.ठेकेदार कुठेतरी फक्त साधी खिचडी तयार करून वाटत आहे.यात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे.

जाहिरात

कोरडा माल शाळेतून बाहेर जातो आणि शिजविलेले माल आत येतो कसा असाही प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे म्हणून ही पद्धत बंद करून पूर्वी प्रमाणे शाळेतच आहार शिजवावा आणि या साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे यासाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघाच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने आज पंचायत समिती श्रीरामपूर येथे एक दिवसीय धरणे व निषेध आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

जाहिरात

यावेळी राज्य समन्वयक सुभाष सोनवणे,तालुका अध्यक्ष कावेरी साबळे , शोभा वमने,मेहेरूनिसा शहा,सुनीता वाघमारे,ज्योती क्षीरसागर,सुनीता हळनोर , भावना वेताळ,संगीता वेताळ,सुनीता खेमनर,कांता राशीनकर, आशा साठे, कमल सातपुते,विजया शिंगटे आदी महिला कर्मचारी उपस्थित होत्या.या प्रसंगी विविध संघटनेच्या प्रतिनिधी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.मनसे जिल्हा अध्यक्ष बाबा शिंदे,समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष जोएफ जमादार, बीजेपी चे नेते प्रकाश चित्ते,सामाजिक कार्यकर्ते अशोक बागुल यांनी पाठिंबा दिला.तालुक्याचे आमदार लहू कानडे यांच्या वतीने अशोक कानडे यांनी आंदोलन करत्यांची भेट घेऊन तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी सामलेटी मॅडम आणि आंदोलनकर्ते यांची भेट घडवून आणली व पंधरा दिवसात प्रश्न सुटला नाही तर मीही तुमच्या सोबत आंदोलनाला बसेल असे सांगितले.यावेळी कार्यालयाच्या वतीने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना अंतिम कारणे दाखवा नोटीस दिल्याचे लेखी पत्र गटशिक्षण अधिकारी सामलेटी यांनी आंदोलनकर्ते यांना दिले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे