संत सावता महाराजांनी दाखवलेल्या कर्मभक्ती मार्गानेच कोल्हे कुटुंबाचा सेवेचा प्रवास – विवेकभैय्या कोल्हे
संत सावता महाराजांनी दाखवलेल्या कर्मभक्ती मार्गानेच कोल्हे कुटुंबाचा सेवेचा प्रवास – विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२४– संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले व उपस्थितांशी संवाद साधला.
वाकडी येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदीरात सराला बेटाचे मठाधिपती प.पु. रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तनास आणि पुणतांबा येथे संत मुक्ताई ज्ञानपिठाचे प.पु. रामानंदगिरीजी महाराज यांचे प्रवचनास कोल्हे उपस्थित राहिले.तसेच ब्राम्हणगांव येथे संत सावता महाराज व संत तुकाराम महाराज मंदीरात जाउन ह.भ.प. श्रीहरी वैष्णव महाराजांचे कीर्तन व टाकळी येथे आयोजित पुण्यतिथी उत्सवास उपस्थित राहिले.रवंदे येथील सावता महाराज पुण्यतिथी व मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम चरित्र चिंतन-सत्संगाचे प्रख्यात प्रवचनकार भाऊ पाटील महाराज यांच्या अमृतवाणीचा लाभ कोल्हे यांनी घेतला व भविकांशी संवाद साधला.
संत सावता महाराज यांनी आपल्याला कर्म रुपी भक्ती मार्ग शिकवला.आपल्या दैनंदिन कामात देव देखील आशीर्वाद देत असतो.संत महंतांच्या शिकवणुकीचा कृतीयुक्त मार्गाचे कोल्हे कुटुंब अनुकरण करत आहे.जनसेवा करण्यात धन्यता मानून विविध माध्यमातून लोकोपयोगी कामात आम्हाला आनंद आहे असे प्रतिपादन विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.