कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑगस्ट २०२५-कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु या ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा गुरुवार दि १४ ऑगस्ट रोजी लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जाहिरात
या प्रसंगी ग्रामसभा निरीक्षक राजु दिघे,उपसरपंच उषा संजय धमाले,ग्रामपंचायत सदस्य भिवराव दहे, ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह पाटील यांच्या सह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.जाहिरात
या प्रसंगी आदीशक्ती ग्रामस्तरीय समिती अध्यक्षा स्वाती कैलास ढमाले यांचा शाल श्रीफळ व चिकूचे झाड देऊन सत्कार करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांनी महिलांना रोजगार निर्मिती, धूम्रपान बंदी, हुंडा प्रथेच उच्चाटन, पशुसंवर्धन व विकास, आरोग्यविषयक योजना, विधवा व अपंग महिलांसाठी विविध योजना, बालविवाह बंदी, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर मार्गदर्शन केले.