कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ काळे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ काळे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर
कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ काळे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

Kopargaon vijay kapse दि २३ जून २०२६– संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बीपीनदादा कोल्हे यांचा २१ जुन रोजी असलेला ६५ वा वाढदिवस संपुर्ण मतदार संघात विविध शैक्षणिक व आरोग्य शिबीर राबवत साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने तालुक्यातील शिंगणापूर गावात मोफत आरोग्य शिबीर राबवत बीपीनदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

नेहमीच सामाजिक शैक्षणिक कामात आग्रेसर असणारे तालुक्यातील शिंगणापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच डॉ विजय काळे यांनी आपल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये मंगळवार दि २३ जुन रोजी बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर राबवत गावातील १०० हुन अधिकच्या रुग्णाची मोफत हिमोग्लोबिन, रक्तातील साखर,रक्तगट,बीपी तपासणी करत मोफत आरोग्य मार्गदर्शन केले तर शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करत कोल्हे यांचा वाढदिवस अनोख्या पध्द्तीने साजरा केला.

लोकनियुक्त सरपंच डॉ.विजय काळे यांना या अभिनव उपक्रमात त्यांचा पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्या राजश्री काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी गावचे उपसरपंच शाम सवत्सरकर,सामाजिक कार्यकर्ते भीमा संवत्सरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तू सवत्सरकर,शालेय शिक्षण समितीचे तज्ञ सदस्य लक्ष्मीकांत सवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक वराट, प्रसाद आढाव,मनोज इंगळे , सुरेश सोनपसारे, सुनील आढाव, कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी, राजू काळे सुखदेव कसबे ,मेजर कानडे जिल्हा परिषद मुख्याध्यापक खेमनर सर , हरकल सर, दत्तात्रय चव्हाण, सोमनाथ आजगे, केरू कुर्हे, छाया काळे, संगीता काळे, रूपाली कुऱ्हे, द्वारकाबाई इंगळे, कमळा आजी, रखमाआई,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल व कुणाल, लाईफ लाईन लॅबोरेटरी चे संचालक इम्रान सय्यद व लॅब असिस्टंट पंकज पडवळ शुभम घोडेस्वार आदी सह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.





