गौतमच्या विद्यार्थ्यांची राज्य बाल चित्रकला स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड
गौतमच्या विद्यार्थ्यांची राज्य बाल चित्रकला स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड
गौतमच्या विद्यार्थ्यांची राज्य बाल चित्रकला स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड
कोपरगाव विजय कापसे दि २ सप्टेंबर २०२४ :-कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झाली असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सालाबादप्रमाणे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा नुकत्याच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या इयत्ता नववी मधील आदर्श मोरे, द्रोण अहिरे व इयत्ता पाचवी मधील शौर्य मोरे या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेद्वारे चमकदार कामगिरी करत या स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य नूर शेख व कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांचेसह सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.