करंजी येथील कर्मवीर काळे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय करंजी बुद्रुक यां शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २ जुलै २०२४– रयत शिक्षण संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयातील पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेत विद्यालयातील घवघवीत यश पसंपादन करत गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दिनकर माळी यांनी दिली आहे.
जाहिरात
या विषयी मुख्याध्यापक माळी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण २९ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यात विद्यालयातील प्रेरणा निलेश कापसे (२३० गुण), तुलसी मच्छिंद्र भिंगारे (२२८ गुण ), सिद्धी राहुल संवत्सरकर (२२० गुण) तर वेदिका दादासाहेब कुहीले (२१४ गुण) मिळवत शिष्यवृत्ती पात्र झालेले आहे या विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच विद्यालयातील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत अरमान अन्वर पठाण (१८४ गुण) गुण मिळवत शिष्यवृत्ती पात्र झाला.जाहिरात
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक दिनकर माळी यांच्या मार्गदर्शनात इयत्ता पाचवी विभाग प्रमुख ललित जगताप व इयत्ता आठवी विभाग प्रमुख सिद्धार्थ बर्डे तसेच विषय शिक्षक सुनील पिंपळे , सचिन डांगे ,देविदास झाल्टे ,राधाकिसन टाकसाळ, संदीप चव्हाण,गजानन सांगळे या विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.जाहिरात
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कारभारी आगवन , रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय निरीक्षक नवनाथ बोडखे, उपविभागीय अधिकारी प्रमोड तोरणे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य डॉ. सुनील देसाई , सांडूभाई पठाण तसेच करंजी पंचक्रोशीतील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.जाहिरातOplus_131072