आमदार आशुतोष काळेकाळे गट

तुम्ही पाठीशी राहा, विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील -आ.आशुतोष काळे

तुम्ही पाठीशी राहा, विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील -आ.आशुतोष काळे

तुम्ही पाठीशी राहा, विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील -आ.आशुतोष काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२४ :- कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागातील गावे म्हणून ज्यांनी आजवर दुष्काळाच्या झळा  सोसल्या त्या गावांचा विकास तर केलाच परंतु या गावातील कार्यकर्त्यांनी जो बंधारा सांगितला तो बंधारा भरून देण्यासाठी स्वत: कालव्यावर कालवा निरीक्षकाप्रमाणे ठाण मांडून बसलो. त्यामुळे हि विकासाची गंगा अविरतपणे अशीच वाहती ठेवण्यासाठी तुम्ही पाठीशी राहा विकास कायम तुमच्या पुढ्यात राहील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी दिला.

जाहिरात

आ.आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील रांजणगाव देशमुख येथे निळवंडे कालव्यातून विविध गावातील बंधारे तुडूंब भरले असून या बंधाऱ्याच्या पाण्याचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सोमवार (दि.२३) रोजी जलपूजन करण्यात आले. तसेच १ कोटी ३० लक्ष रुपये निधीतून रा.मा. ६५ खंडोबा मंदीर ते संदीप गोर्डे घर रस्ता, रांजणगाव देशमुख ते तालुका हद्द (चिंचोली) रस्ता, दलित वस्ती गावठाण ते वडझरी रस्ता, सुनील वर्पे घर ते आत्याभाऊ वर्पे घर रस्ता, दशरथ खालकर घर ते श्री तुळजाभवानी मंदीर रस्ता आदी रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

जाहिरात

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील सर्व भागातील नागरिक मला एक सारखेच आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने विकास करायचा पण कुणावर अन्याय करायचा नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमचे पाणी तुम्हाला आणि त्यांचे पाणी त्यांना दिले आहे. जी रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना २०१९ पर्यंत बंद होती ती योजना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमाणे पदरमोड करून पाचही वर्ष चालविली आणि ज्यावेळी निळवंडे कालव्याचे पाणी दुष्काळी भागाला द्यायचे ठरले त्यावेळी वितरिकांची व्यवस्था नसल्यामुळे आपल्या मतदार संघातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी पाहिजे ती मदत केल्यामुळे आज आपण हा दिवस पाहतो आहे.

कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पाऊस झालेला नाही त्यामुळे जर आपल्याला उजनी उपसा जलसिंचन योजना व निळवंडे कालव्याचे पाणी मिळाले नसते तर पावसाळ्यात टँकर सुरु करावे लागले असते. परंतु आज परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे. आपल्याला अजून विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे. जो राज्य मार्ग ६५ झगडे फाटा ते वडगाव पान फाटा वारंवार दुरुस्त करूनही अवजड वाहतुकीमुळे व रस्त्यासाठी पाया पक्का नसल्यामुळे खराब होत आहे. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करून त्याचा प्रश्न देखील मार्गी लावणार आहे. त्याबाबत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेवून त्यांना परिस्थिती समजावून सांगितली आहे. त्यांनी देखील आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून हा प्रश्न सुटणार आहे. आपल्याला एम.आय.डी.सी.मंजूर झाली असून त्याचा देखील विकासाला हातभार लागणार आहे.त्यामुळे विकासाच्या बाबतीत आपला कोपरगाव मतदार संघ लवकरच आपली वेगळी ओळख निर्माण करणार असून त्यासाठी आपण असेच पाठीशी राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

रांजणगाव देशमुख येथे आशुतोष काळे यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना, तलाठी कार्यालय, राज्य मार्ग ६५, सावळीविहीर रस्ता, वेस-रांजणगाव देशमुख-काकडी रस्ता तसेच प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते व विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होवून झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून या भागातील नागरीका विकासाची परतफेड मताधिक्यातून करतील अशी ग्वाही यावेळी उपस्थित नागरिकांनी दिली .याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे