आपला जिल्हा

आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ जानेवारी २०२५ :- महान समाजसुधारिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि थोर समाज सुधारक क्रांतिज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार ( दि. ०३ ) रोजी कोपरगाव शहरात . आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माळी बोर्डिंग येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जाहिरात

यावेळी कार्यकर्त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उजाळा देतांना सांगितले की, ज्या काळात चूल आणि मुल हीच स्त्रीची व्याख्या होतीमहिलांना शिक्षण दिले जात नव्हते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी हातात पुस्तक घेतले आणि स्री शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यांनी केवळ शिक्षणच नव्हेतर विधवा पुनर्विवाहस्त्री- पुरुष समानतादलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. सामाजिक परिवर्तन चळवळीच्या त्या आधारस्तंभ होत्या. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करून महिलांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.

जाहिरात

त्यांचे कार्य म्हणजे मानवतेचे खरे दर्शन असून त्यांचे विचार आजही आपल्याला दिशा देतात. आपण सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून समानतान्याय आणि मानवतेच्या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपण एक सशक्तसमताधिष्ठित आणि प्रगत समाज घडवण्याचा प्रयत्न करणे हीच खरी त्यांना मानवंदना असेल अशा भावना उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीआजीमाजी नगरसेवककार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे