कोपरगावच्या उद्योजकांची यशस्वी भरारी या स्व.शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद : बिपीनदादा कोल्हे
कोपरगावच्या उद्योजकांची यशस्वी भरारी या स्व.शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद : बिपीनदादा कोल्हे
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २४ मार्च २०२६-संजीवनी युवा प्रतिष्ठान, आरोग्य साथी फाउंडेशन व आत्मा मलिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी मंत्री, सहकार महर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिनाचे औचित्य साधून औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांसाठी मोफत टी.बी. (क्षयरोग) तपासणी व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन सामाजिक सभागृह, औद्योगिक वसाहत, कोपरगाव येथे करण्यात आले, या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जाहिरात
औद्योगिक वसाहतीतील कामगार बांधवांचे आरोग्य सुदृढ राहणे हेच समाजाच्या प्रगतीचे बळ आहे. धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा आरोग्य तपासणी शिबिरांमुळे वेळेत आजारांचे निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत होते. यामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढून निरोगी आणि सक्षम समाज घडवण्यास निश्चितच हातभार लागतो. स्व.कोल्हे साहेब यांनी दूरदृष्टीने औद्योगिक वसाहतीची स्थापना केली होती.स्थानिक उद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारून प्रगती करण्यासाठी अतिशय महत्वाचे योगदान या संस्थेचे आहे.यामुळे बाजारपेठेला ऊर्जा आणि हातभार लागला व कोपरगाव शहरासह अगदी देश विदेशात आपला उद्योजक व्यवसाय करू लागला हे कोल्हे साहेबांचे स्वप्न होते जे पूर्णत्वास जाताना विशेष आनंद वाटतो आहे. चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांचे अतिशय चांगल्या सुविधा औद्योगीक वसाहतीत उपलब्ध व्हाव्या यासाठी सातत्याने काम सुरू आहे अशी भावना बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केली.जाहिरात
या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान , व्हा चेअरमन केशवराव भवर, संचालक मनोजशेठ अग्रवाल, संचालक रोहित वाघ,संचालक सागर शहा,संचालक अभिजीत राहतेकर, संचालक जितेंद्र सिंग सारदा, संचालक पंडितराव भारुड,संचालक डॉ.चंद्रशेखर आव्हाड कारखानदार वसंतराव देशमुख,आरोग्य साथी फाउंडेशनचे चंदन यादव सर, आरोग्य साथी फाउंडेशनचे ध्रुव खतियार सर, आत्मा मलिक हॉस्पिटल श्रेया देवकर मॅडम, कॅम्प इन्चार्ज संदीप दिवे सर, सुवर्णेश साबळे सर,अनिकेत गायकवाड सर आदी मान्यवर कारखानदार तसेच कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात