गुरुराज गॅस एजन्सी तर्फे संकटकाळात देखील सुरळीत गॅस पुरवठा- विशाल जगताप
गुरुराज गॅस एजन्सी तर्फे संकटकाळात देखील सुरळीत गॅस पुरवठा- विशाल जगताप

कोपरगाव विजय कापसे दि १९ मार्च २०२६- जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट घोंगावत असताना संपूर्ण देशात घरगुती गॅस व जीवनावश्यक इंधनाचा तुटवडा भासत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असताना कोपरगाव तालुक्यातील गुरुराज एचपी गॅस एजन्सी मध्ये मुबलक प्रमाणात गॅस टाक्यांचा साठा उपलब्ध असून आमच्या सर्व ग्राहकांना सुरळीतपणे गॅस पुरवठा केला जात असल्याची माहिती गुरुराज एचपी गॅस एजन्सी चे संचालक विशाल जगताप यांनी दिली आहे.

पूर्वी गॅस बुक करण्यासाठी २१ दिवसाची मर्यादा होती ती आता २५ दिवसाची झाली असून गॅस बुक केल्यानंतर अवघ्या २ ते ४ दिवसातच गॅस एजन्सी मार्फत गॅस पुरवठा घरपोच केला जाणार आहे त्यामुळे कोणीही एजन्सीवर विनाकारण गर्दी करून आपला वेळ वाया घालू नये तसेच ज्या ग्राहकांनी अद्यापही आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी केलेली नाही ती देखील त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी.






